पुणे १ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज १ में आजचा हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अंत्यत खास दिवस आहे.कारण आजच्या दिवशी मराठी माणसाच्या अस्मितेला व संस्कृतीला तसेच भाषेला स्वतंत्र राज्याचा हक्क मिळाला.हा दिवस साधा नक्कीच नाही.प्रत्येक मराठी माणसाच्या संघर्षाचा दिवस आहे.तसेच प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्रीयन असल्याचा सार्थ अभिमान आहे.चला तर मग सकाळी -सकाळी ऐकूया…..’ जय जय महाराष्ट्र माझा ‘
आज १ में हा दिवस महाराष्ट्रातील कोणताही नागरिक विसरु शकत नाही.हा दिवस त्यागाचा आहे.तसेच संघर्षाचा देखील आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा आजचा खास दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र शूर वीरांची ,संताची, समाजसुधारकांची पवित्र अशी भूमी आहे.येथील संस्कृती, परंपरा देशभरात नावाजली जाते.अशा या महाराष्ट्राच्या मातीला मानाचा मुजरा, तसेच तुम्हाला देखील महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा,