पुणे २ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक राजधानी दिल्लीतून एक अपडेट आली आहे.दिल्लीत तूफान पावसाने आज हजेरी लावली आहे.त्यामुळे दिल्लीतील रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.दरम्यान प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकर पावसाने सुखावले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या वतीने (IMD) राजधानी दिल्ली साठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान पुढील दोन तासांमध्ये ७० ते ८० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह जोरदार वादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस देखील कोसळण्याची शक्यता आहे.असे हवामान खात्याच्या वतीने म्हटले आहे.त्या मुळे दिल्लीकरांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.