पुणे ३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शनिवारी पहाटे तीन वाजता गोव्यात लैराई देवीच्या यात्रेत देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानकपणे झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे.तर ५० पेक्षा जास्त भाविक हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोवा येथील म्हापसा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान यात्रेत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमी झालेल्या भाविकांची विचारपूस केली आहे.