पुणे ४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबईवरून एक अपघाताची अपडेट हाती आली असून.मुबंईतील कोस्टल रोडवर ४ ते ५ वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला आहे. सदर अपघातात एकूण ९ जण जखमी झाले आहेत.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हा अपघात भिषण होता.यातील सर्व वाहने एकमेकांना धडकली या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे.तर यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून मुंबई मधील कोस्टल रोडवर अपघाताची संख्या वाढली आहे.