पुणे ४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट ही उत्तरप्रदेश येथून आली आहे.दरम्यान नेपाळच्या सीमेवरून बेकायदेशीर रित्या भारताच्या हद्दीत येऊन उत्तरप्रदेश येथील सचिन बरोबर लग्न करून बेकायदेशीर रित्या भारतात राहणाऱ्या सीमा हैदरवर उत्तरप्रदेश येथील गौतम बुद्ध नगरमधील रबुपुरा गावात राहणाऱ्या सीमा हैदरवर हल्ला करण्यात आला आहे.दरम्यान एका युवकाने प्रथम घराच्या दरवाजावर लाथ मारली व नंतर घरात प्रवेश केल्यानंतर सीमा हैदरचा गळा दाबण्यास सुरुवात केली, दरम्यान यावेळी सीमा हैदरने मोठ्या प्रमाणावर ओलांडल्यानंतर आजुबाजुचे लोक जमा झाले.त्यानंतर गळा दाबणारा युवक तेजस झानी या युवकाला बेदम मारहाण केली आहे.दरम्यान सीमा हैदरचा गळा दाबणारा युवक हा गुजरात येथील असल्याची माहिती मिळत आहे.भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची भारत सरकारच्या वतीने हक्कलपट्टी करण्यात आली आहे. पण सीमा हैदर ही बेकायदेशीर रित्या भारतात राहत आहे.तिला भारताकडून भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही.व तिने अद्याप भारत देश न सोडता ती बेकायदेशीर रित्या भारतात राहत आहे.तिने आपण भारतीय युवकाशी लग्न केले आहे.व ती स्वाताला भारतीय समजून भारतीय नागरिकत्व देण्यात यावे अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे.