पुणे ५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातून येत आहे.पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे मध्यवर्ती परिसरात असलेल्या नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची एका व्यक्तीने विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे . दरम्यान सदर घटनेबाबतचा व्हिडिओ समोर आल्यावर गावात एकच खळबळ उडाली आहे.तसेच गावकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे.सदर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना चाॅद नौशाद शेख या युवकाने केल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान गावातील ग्रामस्थ यांनी या बाबत संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी 👮 तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान गावकऱ्यांनी आज पौडमध्ये बंदची हाक दिली आहे. मूर्तीच्या विटंबना नंतर गावात संतापाची लाट उसळली आहे.