पुणे ६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पावसाची अपडेट आली असून मुंबई पुणे.ठाणे.पालघर या जिल्ह्यासह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पुढील ४८ तासांमध्ये महाराष्ट्राला झोडपणार आहे.तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार आहे.तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार आहे.दरम्यान पुणे जिल्ह्याला देखील येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.दरम्यान या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहींना दिलासा मिळणार आहे.तसेच कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट घोषित करण्यात आले आला आहे.दरम्यान पुण्याला ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.उद्यापासून पुण्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान बुधवार ७ मे पासून पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळणार आहे.पण अवकाळी पावसाने शेतकरी वर्गचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.