Home क्राईम पुण्यात पत्नीचा खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाईक वरुन चाललेल्या, नव-याच्या...

    पुण्यात पत्नीचा खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाईक वरुन चाललेल्या, नव-याच्या गस्तीवरील पोलिसांनी 👮 आवळल्या मुसक्या

    114
    0

    पुणे ६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथील नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या करुन रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाईक वरुन जाताना यावेळी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी 👮 त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे नांदेड सिटी येथे झालेल्या हत्याकांडाची घटना समोर आली आहे.त्या मुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

    दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या राकेश रामनायक निसार यांने घरातील अज्ञात कारणांमुळे त्याची पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा दाबून खून केला.रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बबिता हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राकेश यांने बाईक वरुन मृतदेह घेऊन जात असताना रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला भूमकर पुलाखालून स्वामीनारायण मंदिराकडे जाताना त्याची विचारपूस केली असता हा खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे.दरम्यान भारती विद्यापीठ पोलिस व आंबेगाव पोलिसांनी 👮 राकेश याच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान घरातील अज्ञात कारणां वरुन राकेश यांने त्याच्या ९ वर्षांच्या मुला समोर पत्नी बबिता हिचा खून केला असल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी पुढील तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.

    Previous articleपुढील ४८ तासांमध्ये अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, पुणे जिल्ह्याला देखील येलो अलर्ट वा-यासह विजांच्या कडकडाटात पाऊस लावणार हजेरी
    Next article४ महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या… सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here