Home Breaking News ‘ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले,’ ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली...

‘ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले,’ ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे ‘

पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रात्रीच्या दीड वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्कराने पाकिस्तान येथे असणारे एकूण ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून बदला घेतला आहे या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले.दरम्यान जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या मुलींचे सिंदूर पुसले,त्याचे चोख प्रत्युत्तर आहे. दरम्यान या ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले.मी सरकारचे मन:पूर्वक आभार मानते ,असे प्रगती जगदाळे यांनी म्हटले आहे.दरम्यान भारतीय लष्कराने बदला घेतल्यानंतर आज देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान आज भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तान मध्ये असलेल्या दहशतवाद्यांचा तळावर हल्ला करून जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचे रक्त सांडले होते.यावर प्रतिक्रिया देताना हल्यात शुभम द्विवेदी यांचा मृत्यू झाला होता.त्यांच्या पत्नीने ऑपरेशन सिंदूर प्रतिक्रिया दिली.मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून खूप आभार मानते.की माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतला.ज्याप्रकारे त्यांनी पाकिस्तानला उत्तर दिले,त्यांने आमचा विश्वास कायम ठेवला आहे,असे शुभमच्या पत्नीने म्हटले आहे.

Previous articleभारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केला हल्ला
Next articleभारताच्या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार! भारतीय लष्कराची १०.३०वाजता पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here