पुणे ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार जम्मू काश्मीर येथे युद्धविरामानंतर घोषणा होऊन देखील काल शनिवारी पाकिस्तानकडून उल्लंघन करून काही ठिकाणी सल्ले केल्याचे वृत्त काल होते.दरम्यान आज रविवारी ११ मे रोजी सकाळी राजौरी व पूंछ तसेच जम्मू काश्मीर येथील परिस्थिती सामान्य असल्याचे दिसत आहे.तसेच नागरिक आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत.तसेच पंजाबच्या फिरोजपूर मध्ये देखील परिस्थिती सामान्य असल्याचे दिसून येत आहे.परंतू भारत व पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमृतसर मध्ये हाय असून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.