पुणे ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील वातावरण सतत बदल होत असून उद्या सोमवारी १२ मे रोजी तब्बल तब्बल २१ जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह यलोअलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव,अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीने येलोअलर्ट देण्यात आला आहे.त्यामुळे उद्या घरातून बाहेर पडताना काळजी घ्या.