पुणे १२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ‘ऑपरेशन सिंदूर ‘ वर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या वतीने पत्रकार परिषद सुरू झाली आहे.यात एअर मार्शल एके भारती यांनी म्हटले आहे की.आमची लढाई दहशतवाद्यांच्या विरोधात होती यात भारतीय लष्कराच्या वतीने दिनांक ७ मे रोजी पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांच्या एकूण ९ तळावर हल्ला करून ती तळे नष्ट केली आहेत.परंतू पाकिस्तान सैन्याच्या वतीने त्यांनी स्वतः आपली लढाई समजून पाकिस्तान सैन्यांनी आतंकवाद्यांना साथ दिली आहे.
दरम्यान काल आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर ‘ लढाईचे फोटो दिले आहेत.भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तानचे मिसाईल आकाश डिफेन्स सिस्टीमचा वापर करून पाडण्यात आले आहे.ते सर्व मिसाईल चायना मोडचे मिसाईल होते.दरम्यान भारतीय लष्कराची ADS सिस्टीम ही एक मोठी दिवार आहे.या लढाईत पाकिस्तानने आपले नुकसान करून घेतले आहे.व याला पाकिस्तान स्वतः जबाबदार आहे.दरम्यान आता पाकिस्तानचा पापाचा घडा भरलेला आहे.आमची एअर डिफेन्स सिस्टीम ही एक सक्षम अशी सिस्टीम आहे.आमच्या एअर सिस्टीमने पाकिस्तानला चांगला दणका पाकिस्तानला दिला आहे. आमच्या सैनिकांनी पाकिस्तानचे ड्रोन व मिसाईल हे पाडले आहेत.व पाकिस्तानचे नापाक इराद्यावर पाणी फेरले आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेला लष्कराच्या तिन्ही दलाचे सैन्य अधिकारी उपस्थित होते.