पिंपरी -चिंचवड १२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पिंपरी -चिंचवड येथून आली आहे.पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकर चौकात १८ वर्षीय तरुणीवर हेल्मेट घालून दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी या युवतीवर 🗡️ धारदार चाकूने सपासप वार करुन तिला खून केला आहे.दरम्यान या खूनप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाले आहेत.तसेच या खूनाच्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान खून झालेल्या तरुणीचे नाव कोमल भरत जाधव (वय १८ रा.वाल्हेकरवाडी पिंपरी चिंचवड) असे आहे.याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकर वाडी मधील कृष्णाई चौकात काल रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या व हेल्मेट घातलेल्या दोन तरुणांनी कोमल जाधव हिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन तिचा खून केला आहे.दरम्यान भरचौकात हा खून झाल्यानंतर चौकात एकच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान पोलिसांनी 👮 घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतले असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.