पुणे १२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताने दहशतवाद्यांची ९ तळे पाकिस्तान मधील उध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानने अश्रय दिलेले अनेक दहशतवादी यात खलास झाल्यानंतर पाकिस्तानने स्वतः भारतावर सीमारेषेवरुन भारतावर हल्ला केला, त्यानंतर तीन दिवसांमध्येच पाकिस्तानची अक्कल ठिकाण्यावर आली व अमेरिकाकडे युद्धबंदी बाबत धाव घेतली होती.आता पाकिस्तानकडून युद्धबंदीची कोणत्याही प्रकारची विनंती करण्यात आली नसल्याचे विधान पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद शरीफने केली आहे.दरम्मान “६ व ७ मे रोजी पाकिस्तानवर क्रूर आणि भ्याड हल्ले झाले.त्यानंतर आय एन डीने युद्ध बंदीची विनंती केली, दरम्यान आम्ही प्रतिहल्ला केल्या नंतर बोलू असे म्हटले होते.आम्ही १० मे रोजी युद्ध बंदीला सहमती दर्शवली “, असे तो म्हणाला.दरम्यान भारतीय नेटकरी यांनी शरीफच्या पत्रकार परिषदेवर टीका करत आहेत.