पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी १३ में रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.दरम्यान यापूर्वी सकाळी ११ वाजता एस एस सी बोर्डाच्या वतीने पत्रकार परिषद होणार आहे.सदरच्या पत्रकार परिषद मध्ये निकालाची टक्केवारी.यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय कामगिरी व अन्य महत्त्वाची माहिती जाहीर केली जाईल.निकाल एस एस सी मंडाळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार असून. विद्यार्थ्यांना आपल्या आसन क्रमांकाचा वापर करून निकाल तपासता येणार आहे.
दरम्यान दहावी बोर्डाचा परिक्षा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाल्यानंतर खाली दिलेल्या वेबसाईट वर तुम्ही निकाल पाहू शकता.mahahssbord.in mahresult.nic.in , msbshse.co.in ,mh-ssc .ac .in , sscresult.mahahssvord.in तसेच sscresult.mkcl.org ,results.digilocker.gov. in, sscboardpune.in .