Home कृषी उकाड्यापासून पुणेकरांची सुटका! पुण्यात जोरदार पावसाला सुरूवात

    उकाड्यापासून पुणेकरांची सुटका! पुण्यात जोरदार पावसाला सुरूवात

    96
    0

    पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून पुण्यात पाऊस पडत आहे.या पावसामुळे सकाळी अनेक कामगार व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.दरम्यान या पावसामुळे उकाड्यापासून पुणेकरांची मात्र आज काहीप्रमाणावर सुटका झाली आहे.त्यामुळे पुणेकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दरम्मान आज पुण्यात सकाळपासूनच सर्वत्र ☁️ ढगाळ असं वातावरण होते.तसेच काही ठिकाणी पाऊस थांबला आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे.दरम्यान पुण्यात आठवडाभर अशाच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.दरम्यान आज सकाळपासून मुंबई व ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात देखील पाऊस कोसळत आहे.त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.तसेच आज दिवस भर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.आज हवामान विभागाच्या वतीने पुणे.ठाणे. मुंबई.पालघर.वर्धा.तसेच यवतमाळ.भंडारा.चंद्रपूर.गडचिरोली.व गोंदिया या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान या अवकाळी पावसात भिजण्याचा आनंद लहान मुलांनी घेतला आहे.

    Previous articleमहाराष्ट्रात दहावीच्या निकालात ताईगिरी! मुलींची बाजी… कोकणविभाग आघाडीवर ,विभागानुसार दहावीचा निकाल
    Next articleCBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! मागील वर्षापेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थीनी झाले पास,CBSE निकालात देखील ताईगिरी कायम मुली मुलांपेक्षा वरचढ

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here