पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय हवामान विभागाने पुणे शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.दरम्यान हवामान विभागाच्या वतीने पुणे शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहील.दुपारच्या वेळेस ढगांच्या गडगडाटसह,विजा चमकतील तर काही भागांमध्ये ३० ते ४० किलो मीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.आज दुपारच्या नंतर पावसाचा अंदाज आहे.तापमान ३४ ते ३५ अंश पर्यंत खाली आले आहे.
तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होईल तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.हवामान बदलामुळे नागरिक यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच रस्त्यावर वाहन चालवता ना आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी सतर्क राहावे,असा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान या हवामान बदलामुळे तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.काल देखील पुण्यातील विविध भागात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत.त्यामुळे वातावरणात काहीसा उकाडा जाणवत आहे.एकंदरीत संपूर्ण आठवड्यात पुणे व परिसरात मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.असे हवामान विभागाने केले आहे.