Home Breaking News महाराष्ट्रात दहावीचा निकाल झाला जाहीर, कोकण विभागाने मारली बाजी

महाराष्ट्रात दहावीचा निकाल झाला जाहीर, कोकण विभागाने मारली बाजी

92
0

पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या निकालाबाबत महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट २०२५ बाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील निकाल ९४ .१० टक्के लागला आहे.दरम्यान दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी व पालकांना निकाल पाहता येणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रात १६ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. दरम्यान आज निकाल जाहीर होताच सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता आहे.त्यामुळे थोडावेळ थांबून पुन्हा एकदा प्रयत्न करा.दरम्यान महाराष्ट्रात दहावीच्या निकालात कोकण विभागाच्या वतीने बाजी मारण्यात आली आहे.कोकण विभागाची टक्केवारी (९८.११%) नोंदवली होती.दरम्यान बारावीच्या निकालात देखील कोकणाने बाजी मारली होती.

Previous articleअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, झोपलेल्या महायुती सरकारकडे… आमच्याकडे लक्ष द्या! असा शेतकऱ्यांनी फोडला टाहो
Next articleमहाराष्ट्रात दहावीच्या निकालात ताईगिरी! मुलींची बाजी… कोकणविभाग आघाडीवर ,विभागानुसार दहावीचा निकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here