पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचा आज मंगळवारी ११ वाजता पत्रकार परिषदेत एस एस सी बोर्ड पुणे शिवाजी नगर येथे दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात दहावीच्या निकालात ताईगिरी दिसून आली आहे.यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे.एकूण ९६.१४ टक्के मुली यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.तर ९२.३१ टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.तर बारावी नंतर दहावीत देखील कोकण विभागाच्या वतीने बाजी मारली आहे.कोकणात तब्बल ९८.८२ टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारत आघाडीवर आहे.तर महाराष्ट्राची उपराजधानी व नागपूरचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
दरम्यान विभागनिहाय दहावीचा निकाल १) कोकण विभाग ९८.८२% २) शिक्षणाचे माहेरघर पुणे विभाग, ९४.८१% ,३) छत्रपती संभाजी नगर विभाग,९२.८२% ४) मुंबई विभाग,९५.८४% ,५) कोल्हापूर विभाग,९६. ७८% ,६) अमरावती विभाग,९२.९५% ,७) नाशिक विभाग,९३.०४%, लातूर विभाग,९२.७७% , नागपूर विभाग,९०.७८% , टक्के अशी आकडेवारी आहे.