Home राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षांचा राजीनामा

    उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षांचा राजीनामा

    114
    0

    पुणे १४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातून एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून.महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे शहरात मोठा धक्का बसला आहे.दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानकपणे तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान आपली राजकीय बदनामी होत असल्याच्या कारणाला कंटाळून दीपक मानकर यांनी हा राजीनामा दिला आहे.असे बोलले जात आहे.काही दिवसांपूर्वी दीपक मानकर यांच्यावर आर्थिक व्यवहारा बाबत पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण या प्रकरणी पोलिसांनी व्यवस्थीत कागदपत्रांची पडताळणी न करता गुन्हा दाखल केल्याचा आरोप दीपक मानकर यांनी केला आहे.

    Previous articleउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याच्या निवासस्थाना बाहेर प्रहार संघटनेचे आंदोलन
    Next articleक्रिकेटर रोहित शर्माने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here