पुणे १४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आज बुधवारी सकाळी प्रहार संघटनेकडून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी 👮 शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर कडेकोट असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान महायुती सरकारने दिव्यांगांचे हक्काचे पैसे मिळावेत यासह अन्य मागण्यांबाबत हे आंदोलन केले जात आहे.दरम्यान या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांच्या यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दरम्यान प्रहार संघटनेच्या वतीने या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी होत आहे.दरम्यान आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेणार? याकडे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांचे लक्ष लागले आहे.