पुणे १४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती क्रिकेट क्षेत्रातून एक खळबळजनक अपडेट आली आहे.भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतली आहे. दरम्यान मागील ११ महिन्याच्या कालावधीत ही शर्मा यांची फडणवीस यांच्या बरोबर दुसरी भेट आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भेटीची माहिती दिली आहे.तसेच पुढील प्रवासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रोहित शर्मा हे फक्त एक दिवसीय क्रिकेट मध्ये खेळताना दिसणार आहे.