पिंपरी -चिंचवड १४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पिंपरी चिंचवड येथून आली आहे.पिंपरी चिंचवड येथे मेट्रोचे काम सुरू आहे.दरम्यान कामासाठी उभारण्यात येणारा मोठा लोखंडी सांगाडा अचानक पणे कोसळला व सर्व कामगारांची पळापळ झाली आहे.सदर दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही,व मोठा अनर्थ टळला आहे.त्यामुळे आता मेट्रोच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पिंपरी चिंचवड येथील पिंपरी ते निगडीच्या दरम्यान मेट्रोची नवीन उन्नत मार्गिका टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.व त्यासाठी लोखंडी पिलर टाकले जात आहे.दरम्यान आज सायंकाळी एक लोखंडी पिलर टाकण्याचे काम सुरू असताना अचानकपणे हा पिलर कोसळला आहे.दरम्यान पिलर कोसळला असलातरी सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.पिलर चा फक्त सांगाडा कोसळला आहे.दरम्यान या दुर्घटना नंतर मेट्रोच्या कामाची मात्र पोलखोल झाली आहे. दरम्यान याठिकाणी मेट्रोचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते याचा फायदा संबंधित ठेकेदाराने घेत पडलेला सांगडा तातडीने हालवला आहे.