पुणे १४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक अपडेट ही दिल्ली येथून आली आहे.नवी दिल्ली येथे न्या.भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली आहे. आज १४ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.दरम्यान या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.तर भूषण गवई हे सहावे मराठी सरन्यायाधीश आहेत.तर दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत.
दरम्यान विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला.त्यांच्या जागी आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून गवई काम पहाणार आहेत.दरम्यान त्यांचा कार्यकाळ फक्त ६ महिन्यांचा असेल.नोव्हेंबर २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.