Home कृषी पुणे व सातारा गारपीट व वादळीवाऱ्यासह तुफान पाऊस, आस्मानी संकट २४ तासांसाठी...

    पुणे व सातारा गारपीट व वादळीवाऱ्यासह तुफान पाऊस, आस्मानी संकट २४ तासांसाठी हवामान खात्याचा अलर्ट

    68
    0

    पुणे १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज पुणे व सातारा या दोन जिल्ह्यात गारपीट व वादळीवाऱ्यासह पाऊस या दोन जिल्ह्यांना झोडपून काढणार.येणा-या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यावर आस्मानी संकटाचा सामना करावा लागू शकतो.तर हवामान खात्याच्या वतीने अलर्ट घोषित करण्यात आला आहे.दरम्यान महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.सातारा जिल्ह्यात जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.तसेच पुणे जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान पुढील येणाऱ्या २४ तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील असणारे जिल्हा निहाय हवामान अंदाज याप्रमाणे आहे.

    दरम्यान सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान पुढील २४ तासांमध्ये सातारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.यावेळी ताशी ४० ते ५० किलो मीटर वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तविण्यात येत आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आकाश अंशतः व ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा गडगडाटी पाऊस वादळाची शक्यता आहे.यावेळी वारे ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.जिल्ह्यात कमाल तापमान २४ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. तसेच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस कोसळला आहे.दरम्यान आज कमाल तापमान ३६ अंशांवर तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस असे आहे.आकाश अंशतः ढगाळ राहील व मध्यम पावसाची शक्यता आहे.तसेच ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा पारा ३७ अंशावर राहिल तसेच सोलापूरात ढगाळ आकाशासह मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट व वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळू शकतो.तसेच यलोअलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान पुणे जिल्ह्यात ☁️ ढगाळ वातावरण असून मागील २३ तासांमध्ये ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची सुरूवात झाली आहे.तर पुढील २४ तासांमध्ये पुण्यातील पारा ३४ अंशांवर स्थिर राहील.तसेच वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाच्या वतीने जारी केला आहे.तसेच  कोकण व परिसरात चक्रकार वारे वाहत आहे.पश्चिम बंगालपासून झारखंड.विदर्भ. तेलंगण ते रायलसीमापर्यत तसेच विदर्भ पासून मराठवाडा.कर्नाटक.केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.तसेच राज्यात पूर्वमोसमी वादळं पावसाचे सावट कायम आहे.

    Previous articleशिक्षणाच्या माहेरघरात कोयता गॅंगची दहशत कायम, पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट
    Next articleदहशतवाद्यांना शोधून काढून मारणार इंडियन आर्मी!६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here