पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे .अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्याचा कट रचण्यात आला आहे.दरम्यान ट्रम्प यांना मारण्यासाठी ‘कोड-८६४७ ‘ जारी करण्यात आला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस व FBI कडून या प्रकरणी तपास सुरू आहे.तर FBI चे माजी संचालक जेम्स कोमी यांनी हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान जेम्स यांना यासाठी जबाबदार धरून तुरुंगात टाकलं पाहिजे,असे नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गब्बार्ड यांनी म्हटले आहे. दरम्यान ट्रम्प यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला झाला होता.त्यात ते थोडक्यात बचावले होते.