पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पाकिस्तानला उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं आहे.पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तरने ऑपरेशन सिंदूर बाबत बोलताना म्हटले आहे की. भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे ,असा कबुलनामा केला आहे. तसेच पाकिस्तान मधील भोलारी येथील एअरबेस नष्ट करण्यात आले आहे .तसेच १० मे रोजी सकाळी भोलारी एअरबेसवर ४ ब्रम्होस मिसाईलचा मारा करण्यात आला,व हे मिसाईल भोलारी येथील हॅगरवर पडले,व भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचे विमान नष्ट झाले आणि काही जवानांचा मृत्यू झाला आहे.असे देखील मसूदने म्हटले आहे.