पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देऊन मिसाईल पुरवणा-या तुर्कीला भारताकडून दणक्यावर दणके बसत आहे.दरम्यान तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंद व काजू मेवा यावर महाराष्ट्रातील पुण्यातील व्यापा-यांनी बहिष्कार टाकला आहे.तसेच भारत देशा मधून तुर्कीमध्ये फिरायला जाणा-या भारतीयांनी सर्व बुकिंग रद्द केली आहेत.तसेच भारतीय फिल्म इंडस्ट्री कडून देखील मोठ्या प्रमाणावर धक्का देण्यात आला आहे.FWICE ने नेटफ्लिक्स, प्राईम, जिओ हाॅटस्टारला पत्र लिहून तुर्की सिनेमा आणि वेब सिरीज लवकरच काढून टाकायला सांगितले आहे.