पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज अवकाळी पावसाने चांगलाच हाहाकार उडाला आहे.पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.दरम्यान आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडाकडाटासह पाऊस कोसळत होता.या पावसामुळे या भागातील सर्वच रस्ते जलमय झाले आहेत.तर ओढ्या नाल्यांना पूर आला आहे.दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक तलाव तुडुंब भरले आहेत.तर या भागातील पिंपळगाव व म्हाळुंगे येथे या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात घुसले आहे.यामुळे लहान मुलांसह वयोवृद्धांचे चांगलेच हाल झाले आहे.तर शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.तर तुफान पावसामुळे खुर्द गावाकडे जाणारा डांबरी रस्ताच वाहून गेला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीमालाचे नुकसान झाले आहे.