पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून.दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार वादळीवाऱ्यासह धुमाकूळ घातला आहे.तसेच आज शुक्रवारी पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान आज सकाळ पासूनच पुणे शहरात तसेच पिंपरी चिंचवड मध्ये तसेच पुणे जिल्ह्यात पाऊस कोसळला आहे.पावसामुळे अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते.
आज पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड व उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान अचानकपणे आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली आहे.पुण्याच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला आहे.कर्वेनगर तसेच शिवाजीनगर व पिंपरी चिंचवड भागात चांगला दमदार पाऊस झाला आहे , दरम्यान मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिक ठिकाणी पाणी साचले आहे.त्यामुळे वाहतूक व्यवस्थे वर पावसाचा परिणाम झाला आहे.दरम्यान आज पुणे शहराचे कमाल तापमान ३२.०८ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे.तसेच किमान तापमान २२.०७ अंश सेल्सिअस होते.भारतीय हवामान खाते पुण्याच्या वतीने पावसासंदर्भात माहिती दिली आहे की.पुढील ५ दिवस पुणे शहराचे हवामान ☁️ ढगाळ राहील व दुपार नंतर ताशी ३० ते ४० किलो मीटर वेगाने वारे वाहतील तसेच मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्या चा अंदाज वर्तविण्यात आला आहे.