पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली आहे.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील छगन भुजबळ यांच्या फार्महाऊसवर इन्कम टॅक्सची धाड पडणार आहे.अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत.मी सर्व मॅनेज करतो असे सांगून १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार यातील आरोपी राहुल भुसारे हा बीएससी झालेला असून तो सुशिक्षित बेरोजगार आहे.त्यांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना चक्क तुमच्या फाॅर्महाऊसवर इन्कम टॅक्सची रेड पडणार असे सांगितले,तसेच यातील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत.मी मॅनेज करतो असे सांगितले व १ कोटी रुपयांची खंडणी मागितली.दरम्यान आरोपीला पैसे देण्याचे सांगून त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.