पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच आज शनिवारी हवामान विभागाच्या वतीने राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान पुण्यासह एकूण २५ जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार आहे.त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान आज शनिवारी वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर.जिल्हे यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तर कोकण व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार आहे.दरम्यान आज हवामान विभागाच्या वतीने एकूण २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित केला आहे.यात पुणे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे.तसेच नंदूरबार, नाशिक,अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड , नांदेड , लातूर. धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, तसेच गडचिरोली, गोंदिया, नागपूर, आणि वाशिम या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.त्यामुळे घरातून बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे देखील हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.