पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे दबंग उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर तेथील पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहर पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
दरम्यान पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी पुणे शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान पुणे येथे गिल कार्यरत असताना एक ‘दबंग ‘ अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा होता.पुणे शहरात परीमंडळ १ मध्ये गणेशोत्सव असो किंवा मोर्चा असो त्यांचे कामकाज एकदम चोख व कौतुकास्पद राहिलेले आहे. दरम्यान काल राज्यामंत्रिमंडाळाच्या वतीने अनेक पोलिस अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत.त्यात मात्र पुण्यातील गिल व देशमुख यांच्या पुण्यातच वर्णी लागली आहे.दरम्यान पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपायुक्त संदीपसिंग गिल यांना आज शनिवारी बदलीचा आदेश दिला आहे.दरम्यान आता पुणे जिल्ह्यांला एक गिल यांच्यामार्फत ‘दबंग’ असा पोलिस अधीक्षक मिळाला आहे.