पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २ मोस्ट वाॅन्टेड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे १) अब्दुला फैज शेख उर्फ डायपरवाला २) तल्हा खान अशी त्यांची नावे आहेत, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही दहशतवादी इंडोनेशियातील जकार्ता येथे लपून बसले होते, दरम्यान ते भारतात परतताना या दोघांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इम्रिगेशन विभागाच्या वतीने अडविण्यात आले,हे दोघेही पुण्यातील आयसिस पुणे स्लीपर माॅड्यूल या प्रकरणात एनआयए ने दोघां जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.