Home क्राईम मुंबईतील ताज महाल हॉटेल व एअरपोर्ट बाॅम्बेच्या सहाय्याने उडवून देण्याची ई-मेल द्वारे...

    मुंबईतील ताज महाल हॉटेल व एअरपोर्ट बाॅम्बेच्या सहाय्याने उडवून देण्याची ई-मेल द्वारे धमकी, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर

    59
    0

    पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ व ताजमहाल हॉटेल बाॅम्बेच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी ईमेल द्वारे पोलिसांना आली आहे.त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.मुंब‌ई पोलिसांनी ईमेल पाठवणा-याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‌, तसेच पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून मुंबई एअर पोर्ट व ताज हॉटेल परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ व ताज महाल पॅलेस हाॅटेल पाईप बाॅम्बेच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकीचा ई-मेल आज सकाळी शनिवारी विमानतळ पोलिसांना आला आहे.दरम्यान दिल्ली संसदेवर हल्ल्याप्रकरणी फाशी झालेल्या दहशतवादी अफझल गुरू व सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारक रित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे ‌, दरम्यान सदर धमकीचा ई-मेल येताच मुंबईतील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान viduthalai puli vellum नावाचा ई-मेल आयडीवरुन धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान ईमेल आयडीच्या वापरकर्त्याविरोधात  मुंबई पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहिताचे कलम १२५,३५१,(१) (३) व ३५१,(१)  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Previous articleविजांसह तसेच वादळीवाऱ्यासह मुसाळधार पाऊस कोसळणार, पुणेसह एकूण २५ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट मोडवर
    Next articleमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एन‌आय‌एने पुण्यातील आयसिस स्लीपर माॅड्यूल प्रकरणी,मोस्ट वाॅन्टेड २ दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here