पुणे १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून खळबळजनक अपडेट हाती आली आहे.पुणे शहरातील बिबवेवाडी रोजच हाणामारी कोयता गॅंगचा राडा हे नित्यनेमाने घडत आहे.पुण्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार करण्यात आला आहे.धक्कादायक म्हणजे केवळ गाडीला कट लागल्याच्या कारणांमुळे दोन जणांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने चक्क हवेत गोळीबार करत बिबवेवाडी येथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान गोळीबारानंतर या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील बिबवेवाडी मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान गाडीला कट मारल्याच्या रागातून हवेत गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबारा चा आवाज ऐकून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान मध्यरात्रीच्या २ वाजण्याच्या सुमारास हा सर्व गंभीर प्रकार घडला आहे.यातील दोघेजण दुचाकीवरून जात होते.यात एका दुचाकीचा दुसऱ्या दुचाकीला धक्का लागला व याच रागातून दोघांमध्ये वाद झाला व नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला आहे.तसेच या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान यातील दोनजण पळून गेले दरम्यान गोळीबार करणारे दोघेजण हे रेकाॅर्ड वरील गुन्हेगार आहेत.त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान गोळीबार करणाऱ्या दोन जणांची नावे गणेश भालके.व देवा डोलारे अशी त्यांची नावे आहेत.तर या गोळीबारातील ४ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.