Home क्राईम शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या बीड बंदची हाक

    शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या बीड बंदची हाक

    82
    0

    पुणे १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून आली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला जंगलात नेऊन लाठ्या काठ्या तसेच पट्ट्याने मारहाण केल्याप्रकरणी तसेच अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी.आता महाराष्ट्रातील सर्व स्तरातून या गंभीर घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.दरम्यान आता या घटनेच्या निषेधार्थ उद्या १९ मे सोमवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा संघटनांसह अन्य सर्व जातीधर्माच्या लोकांचा या बीड बंदला पाठिंबा आहे.तसेच सर्व नागरिक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेधार्थ एक मोठी रॅली काढून या घटनेचा जाहीर निषेध करणार आहे.दरम्यान या मारहाणीत १० ते १२ जणांचा समावेश होता.व ही सर्व मुले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वाल्मीक कराड याच्या गॅंगची मुलं होती.तसेच सदर घटनेच्या वेळी काही नागरिकांनी ही घटना पाहिल्या नंतर व संबंधित मारहाण थांबल्यामुळे यातील गंभीर जखमी झालेल्या शिवराज याचा जीव वाचला आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या तरुणांनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ बनविला आहे.तर संतोष देशमुख यांच्या हत्या सारखी शिवराज याची हत्या करण्याचा प्रयत्न या गुंडाचा होता.दरम्यान बीड जिल्हा पोलिस यांनी यातील काही गुंडांवर कारवाई करुन त्यांना अटक केली आहे.तर यातील काही गुंड हे फरार झाले आहेत.दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी असे म्हटले आहे की खरंच यातील गुंड हे गुंड प्रवृत्तीचे असेल तरच त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल.

    Previous articleहैद्राबादमध्ये एका इमारतीला भीषण आग 🔥, आगीत होरपळून ८ जणांचा मृत्यू
    Next articleखेडमध्ये जगबुडी नदीत कार कोसळून ५ जण ठार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here