पुणे १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही सोलापूर येथून आली आहे.सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील सेंट्रल इंडस्ट्री या टाॅवेल बनवणा-या कारखान्याला आज रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अशी आग 🔥 लागली आहे.दरम्यान या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ५ ते ६ कामगार हे कारखान्यात आगीत अडकून पडले आहेत.यातील अन्य जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या आगीची माहिती सोलापूर महानगरपालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या सदरची आग ही आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.दरम्यान मागील ४ ते ५ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले नाही.यावरुन ही आगीची घटना किती मोठी आहे.याचा अंदाज येत आहे.तरी अग्निशमन दलाच्या जवान आगीवर प्रयत्न मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.दरम्यान या कारखान्यात टाॅवेल बनवण्याचे काम चालते अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान ही आग 🔥 नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.