पुणे १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक खळबळजनक अपडेट ही तेलंगण येथून आली आहे.दरम्यान सूत्रांकडून मिळाले ल्या माहितीनुसार तेलंगणातील हैदराबाद येथील गुलजार हाऊसमध्ये एका इमारतीला भीषण आग 🔥 लागून ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.दरम्यान या आगीच्या घटनेत ३ जणांचा मृत्यू हा घटनास्थळीच झाला आहे.अन्य ५ जणांचा मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.यातील मृतांमध्ये ३ माहिला दोन मुलांचा समावेश आहे.इतर ३ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे .तर गंभीर रित्या जखमी झालेल्या अन्य काही जखमींना उस्मानिया येथील डीआरडीओ च्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान ही आग 🔥 नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.