पुणे १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईतून आली आहे.मुंबईमधील विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला आता थोड्याच वेळापूर्वी आग लागली आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे , दरम्यान आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत,व आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.दरम्यान स्कॅनिंग मशिन मधील शाॅकसर्किट मुळे ही आग लागली आहे.दरम्यान ही आग छोट्या प्रमाणावर होती व तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे ,अशी माहिती विधानसभेत महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे, दरम्यान या आगीत कोणतीही प्रकरची जीवीतहानी झालेली नाही असं देखील त्यांनी सांगितले आहे.