पुणे १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. दरम्यान अशातच आता राज्य सरकारच्या वतीने राज्यात पावसाने किती नुकसान केले याची माहिती समोर आली आहे, दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाने २७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.तसेच अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले असून एकूण १३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे,
दरम्यान आज सोमवारी सकाळपासून अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले आहे, वरुड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी तसेच धारणी तालुक्या सह मेळघाट भागात वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळला आहे.त्यामुळे कांदा,केळी, संत्रा 🍊, आणि इतर पिके अक्षरशः आडवी झाली आहेत, शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे,व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तर चिंचोना येथे अंगावर वीज पडल्याने दोन बैलांचा देखील मृत्यू झाला आहे, त्यामुळे पावसाच्या वेळी जनावरांना शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.