पुणे १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पात्रात कार कोसळून मोठा भीषण अपघात झाला आहे.दरम्यान १०० फुट खाली कार कोसळल्याने कार मधील ५ जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ही घटना घडली आहे.दरम्यान कार मधील संबंधित कुटुंब हे मुंबई मीरा रोड येथून देवरुख येथे एका नातेवाईका च्या अंत्यसंस्कारा साठी जात असताना कार अतिवेगाने जात असताना कार वरील चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळली दरम्यान पोलिसांनी 👮 घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार मधील सर्व मृतदेह शवविच्छेदना साठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.