पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कल्याण येथून आली आहे, कल्याण पूर्व भागातील मंगळराघो नगर येथील चिकणीपाडा भागात आज मंगळवारी दुपारी जुनी धोकादायक ‘सप्तश्रुंगी’ इमारतीचा स्लॅब कोसळुन मोठी दुर्घटना घडली आहे, दरम्यान या दुर्घटनेत सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर आणखीन काहीजण या स्लॅबच्या ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान सदर दुर्घटनाबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कल्याण मधील चिकणीपाडा येथील सप्तश्रृंगी ही जुनी व धोकादायक इमारत कोसळली आहे.दरम्यान ही चार मजली इमारत होती.सदर घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर घटनासथळी अग्निशमन दलाच्या जवान व आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी व पोलिस यंत्रणा तातडीने दखल होऊन बचावकार्य सुरू केले.प्रथम ४ जखमींना बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान या दुर्घटनेत एक अडीच वर्षाची मुलगी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ढिगा-याखाली अडकलेल्यांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे.असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.३ महिला व २ पुरुष तसेच १ दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे, दरम्यान सदरची सप्तश्रृंगी ही चार मजली जुनी इमारत आहे.व ती धोकादायक स्थितीत आहे.तरी सदर इमारतीला धोकादायक इमारत घोषित करण्यात आले होते.महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. महानगरपालिकेच्या वतीने सदर इमारती मधील रहिवाशांना यापूर्वीच बाहेर काढणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही,व आज ही इमारत कोसळली व मोठी दुर्घटना घडली आहे.सदर घटनेला महानगरपालिकेचे अधिकारीच दोषी आहेत.असा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे.दरम्यान प्रशासनाच्या वतीने ढिगा-याखाली अडकल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.