पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आज सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.कोकणात देखील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे,तर रत्नागिरी जिल्ह्यात देखील तुफान पाऊस झाला आहे.दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे.कोकण रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे, त्यामुळे कोकण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे, अनेक रेल्वे ट्रेन ह्या रेल्वे ट्रॅकवर तर काही ट्रेन ह्या रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत, तसेच कोकण रेल्वे मार्गावर वेरवली व विलवडे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवरच दरड कोसळली आहे.त्यामुळे रेल्वेमार्ग बंद झाला आहे.