Home कृषी पुण्यात मुसाळधार, वाघोलीत भलेमोठे होर्डिंग कोसळले तर रस्ताला पडल्या भेगा नागरिकांची तारांबळ

    पुण्यात मुसाळधार, वाघोलीत भलेमोठे होर्डिंग कोसळले तर रस्ताला पडल्या भेगा नागरिकांची तारांबळ

    179
    0

    पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज मंगळवारी पुणे व कोकणासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. वादळीवाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळत आहे.पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाला सुरुवात झाली, दुपारनंतर पुण्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पुणे ते अहिल्यानगर रोडवर वादळीवाऱ्यामुळे वाघोलीत भलेमोठे होर्डिंग कोसळले आहे,या होर्डिंग्ज खाली ७ ते ८ दुचाकी सापडल्या आहेत.दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.व कोणीही जखमी झाले नाही,

    दरम्यान आज सकाळपासूनच पुण्यात सर्वत्र ☁️ ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.तसेच हवामान विभागाच्या वतीने देखील पुण्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता, त्यानुसार आज दुपारी साडेतीन वाजता पावसाला सुरुवात झाली.हा पाऊस सर्वत्र कोसळत होता.अनेक ठिकाणी 🌲 झाडं पडली तर वानवडी येथे पदमा पॅलेस येथे रोडवर झाड कोसळले त्यामुळे या रोडवरील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती.तसेच विमानतळाच्या परिसरात देखील मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे.त्या मुळे नवीन विमानतळाच्या टर्मिनलवर सर्वत्र पाणीच पाणी साचले होते.येथील ड्रेनेज लाईन मधून पाणी बाहेर रस्त्यावर येत होते.दरम्यान विमानतळावरील‌ टर्मिनसवर पाणी साचल्याने याचा त्रास झाला आहे.व प्रवाशांची तारांबळ उडाली होती.दरम्यान पुणे ते अहिल्यानगर रोडवर वाघोली सणसवाडी येथील एक भलेमोठे होर्डिंग कोसळल्यानंतर या दुर्घटनेत ७ ते ८ दुचाकीचे नुकसान झाले आहे.

    Previous articleराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
    Next articleकल्याणमध्ये धोकादायक इमारत कोसळुन६ जण ठार,स्लॅबच्या ढिगा-याखाली काहीजण अडकल्याची भीती

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here