पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार छागन भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, दरम्यान त्यांनी शपथ घेण्यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे,यावर आता अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे, म्हणजे एक भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? राज्याची जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्या सारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणा-यांना हा एक संदेश आहे, की तुम्ही आमचं काही वाकडं करणार नाही? असा काय नाईलाज आहे की, राजकारण सभ्य माणसं मिळत नाहीत? असे देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.