पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आज मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, दरम्यान राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत भुजबळ यांना शपथ दिली जाणार आहे, दरम्यान धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेले खाते अन्न नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण खाते त्यांना दिले जाणार आहे, दरम्यान शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मंत्रीमंडळात स्थान दिले नाही व त्यांना साईटला करण्यात आले,अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती, दरम्यान येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचे मतं मिळण्यासाठी महायुती सरकारने भुजबळ यांना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छागन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली जात आहे,अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्याने आता नाशिक जिल्ह्यात महायुतीचे ४ मंत्री झाले आहेत.तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री पद हे अद्याप रिक्त आहेत.महायुती मध्ये पेच असल्याने हे पद रिक्त आहे.