पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक अपडेट आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार छागन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे, आज मंगळवारी साडेदहाच्या सुमारास राज्यपाल यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली, दरम्यान या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, दादा भुसे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे खाते मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.