पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा पुरा बोजवारा उडाला आहे, दरम्यान पुण्यात सलग दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे, त्यामुळे पुणेकर नागरिकांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे, महायुतीमधील उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी मोटार सायकल वरून आले व त्यांच्या कारवर गोळीबार केला आहे.यात बुलेट कारची काच फुटून आत गेली आहे.सुदैवाने मात्र हा नेता वाचला आहे.
सदर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुण्यातील वारजे येथील गणपती माथा येथे शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते युवासेनाचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांचे कार्यालय आहे, सोमवारी रात्री बारा वाजता ते त्यांच्या कार्यालयात बसले होते.व त्यांची कार बाहेर ऊभी असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला आहे.दरम्यान या गोळीबारात गोळी कारची काच फुटून आत गेली आहे.दरम्यान घारे हे कार्यालयात असल्याने ते या गोळीबारात सुदैवाने वाचले आहेत , हल्लेखोर हे गोळीबार करून मोटरसायकल वरून फरार झाले आहेत.दरम्यान सदरचा गोळीबार हा पुर्व वैमनस्यातून झाला आहे,का आदी प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान पुण्यात यापूर्वी बिबवेवाडी येथे गोळीबार झाला होता.हा सलग दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे.दरम्यान या प्रकरणी वारजे पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर या वारजे भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.