पुणे २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक खळबळजनक अपडेट ही नाशिक येथून आली आहे, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील मुंढेगाव येथे आसणा-या जिंदाल कंपनीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे, सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही,असे वृत्त प्रथमदर्शनी मिळत आहे.दरम्यान कंपनीच्या गेट नंबर ४ येथे ही आग 🔥 लागली आगीनंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन या आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.दरम्यान ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, दरम्यान यापूर्वी देखील या कंपनी मध्ये आग लागली होती तसेच तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.